
बीडः सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात पुन्हा प्रलंबित १९५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले त्यात ९ जन पाॅझीटीव्ह आले असुन, २ जनांचे रिपोर्ट अनिर्णित आहेत. १८४ जन निगेटीव्ह आले तर ४३३ जनांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णात संपर्कातील व सहवासातील असल्याने चिंता वाढवणारी आहे.
रात्री आलेल्या अहवालात बीडचे सात तर शिरुर व आष्टीतून प्रत्येकी एकाचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान परळीत काल रुग्ण संख्या वाढल्यामुळे दोन दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांत बीड तालुक्यातील चौसाळा येथील तीन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासात आलेले असून बीड शहरात एक नवीन तर तीन पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. शिरुर तालुक्यातील तागडगाव व आष्टी शहरात आढळलेले रुग्णही पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. जिल्ह्यात आजवर आढळलेले रुग्ण बाहेरुन आलेली होती. मात्र नव्याने आढळून येत असलेले रुग्ण सहवासातील असल्याने चिंतेत भर पाडणारी आहे.