धारुरजवळ भीषण अपघात; उभ्या ट्रक्टरवर कार धडकली.

किल्ले धारूर दि.20 मार्च – केज धारूर (Kaij Dharur) रस्त्यावर कासारपाटी जवळ उभ्या असणारे बसला ओव्हरटेक करताना वेग न आवरल्याने स्विफ्ट डिजायर कार उभ्या असणारे ट्रक्ट्ररच्या ट्रॉलीवर जोरदार आपटल्याने झालेल्या भीषण अपघातात (Accident) कारचा चक्काचूर झाला. अपघाताची भीषणता पाहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांनी पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार कळंब येथील सुरेश लमके हे आपल्या पत्नी व आठ वर्षीय मुलासह स्विफ्ट कारने (क्र. एम एच 25- ए एस 8975) धारुरकडे जात होते. यावेळी केज धारूर रस्त्यावर कासारी पाटी जवळ प्रवाशी उतरण्यासाठी बस उभी असल्याने केज कडून धारूर कडे जाणारी त्यांची स्विफ्ट कार (क्र. एम एच 25- ए एस 8975) हि वेगात बसला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात ऊस तोड कामगार घेऊन जाणाऱ्या व रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रक्टरच्या ट्रालीवर (Tractor trolley) जाऊन जोरात धडकली.
यामध्ये कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. मात्र सुदैवाने कारला एअर बँग (Air Bag) असल्याने त्यां मधील तीन प्रवाशी बालंबाल बचावले. अपघाताची भीषणता मात्र मोठी असल्याने अपघातस्थळी गर्दी झाली होती. कार मधील जखमी प्रवाशावर धारूर (Dharur) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात जखमी संगिता सुरेश लमके (वय 35) रा.कळंब या किरकोळ जखमी झाल्याचे कळते. यावेळी विशाल लमके हा आठ वर्षीय बालक त्यांच्या सोबत होता.
( A tragic accident near Dharur; The car hit a vertical tractor. )