मंत्री नवाब मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर प्रकरणात आले ट्विस्ट; साक्षीदारच निघाला ‘फरार’ आरोपी.

मुंबई दि.8 अॉक्टोंबर – अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं (NCB) अटक केली आहे. मुंबई क्रुझवर टाकलेल्या छाप्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदार किरण प्रकाश गोसावी याच्यावर फसवणूकीचे गुन्हे असून एका प्रकरणात तो फरार असल्याचे समोर आले आहे.
(A twist came in the case after the assassination of Minister Nawab Malik; The ‘absconding’ accused went as a witness.)
काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं आर्यन खानसह (Aryan Khan) 7 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावली. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर त्याला सोबत घेऊन जाताना किरण प्रकाश गोसावी आणि भाजपचे नेते (BJP Leader) मनीष भानुशाली उपस्थित होते.
यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. गोसावी या प्रकरणातील साक्षीदार आहे मात्र आता गोसावी एनसीबीच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह आणखी तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे.
दरम्यान, आर्यनला घेऊन जाताना किरण प्रकाश गोसावी आणि भाजपचे नेते मनीष भानुशाली दोघेही अधिकारी असल्याचं सर्वांना वाटलं होतं. मात्र मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर सदरील व्यक्ती भाजपाचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले. चौकशीत साक्षीदार (witness) असलेला गोसावी हा तर फरार आरोपी निघाला. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे.