माझं गाव

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवकाचा पीकअपच्या धडकेत मृत्यू; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.29 जुलै – सैन्य भरतीची (Military recruitment) तयारी करत असलेल्या तरुणास पहाटे पाच वाजताच्या सुमारास पीकअपने पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. उमेश परमेश्वर घुले असे मृत तरुणाचे नाव आहे. धारुर तालुक्यातील गांवदरा येथे हा अपघात (Accident) झाला.

(A young man preparing for military recruitment dies in a pickup crash; Incidents in Dharur taluka.)

उमेश परमेश्वर घुले (वय 18) रा.गांवदरा ता.धारुर हा सैन्य भरतीसाठी (Military recruitment) प्रयत्न करत होता. गांवदरा येथील अनेक तरुण गावातून जाणाऱ्या खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्गावर (548 C) (National Highway) दररोज व्यायाम करतात. याच महामार्गावर तरुण रंनिंगची प्राक्टीस करतात.

मिल्ट्री, पोलीस भरतीसाठी पुर्व तयारी करण्यासाठी गावंदरा ते आंबेवडगाव या मार्गावर रंनिंगसाठी गेलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. आज गुरुवारी सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान युवक व्यायाम करत असतांना अज्ञात वाहनाने उमेश परमेश्वर घुले (वय 18) यास जोराची धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला.

मालवाहु बोलेरो पिअकपने तरूणास उडवल्याचे सांगितले जात आहे. अपघात (Accident) होताच जखमी तरुणास अंबेजोगाई येथे रूग्णालयात हालवण्यात आल्याचे समजते. मात्र उपचार सुरु असतानाच तरुणाची प्राणज्योत मावळली. अद्याप या प्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल झाला नव्हता. तरुणाच्या अपघाती निधनामुळे गांवदरा गावात शोककळा पसरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!