अल्पवयीन मुलीवर अत्याचार; केज तालुक्यातील घटना.

केज दि.23 जुलै – केज तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन चार महिने वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून केज पोलिसांनी पुणे येथून मुलीची सुटका करीत आरोपीला गजाआड (Arrested) केले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोस्कोसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये (Scheduled Castes and Scheduled Tribes Prevention Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Abuse of a minor girl; Incidents in Kaij taluka.)

केज तालुक्यातील एका गावातील साडेसोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस (minor girl) आरोपी श्रीराम संतराम वरपे (रा. कोरडेवाडी ता. केज) याने 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्री फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी केज पोलिसात (Police) अपहरणाचा (Kidnapping) गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीचा तीन ते चार वेळा आरोपीचा माग काढला. परंतू सुगावा लागताच आरोपी पोबारा करत असे. यामुळे पुण्याहून पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागत असे.

दरम्यान, आरोपी व मुलगी हे लोणीकाळभोर येथे असल्याची माहिती खबऱ्या मार्फत दि. 21 जुलै रोजी केज पोलीसांना मिळाली. पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, जमादार बाळकृष्ण मुंडे, जमादार दिनकर पुरी, पोलीस नाईक मंदे यांचे पथक तात्काळ पुण्याला रवाना झाले.

गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास या पथकाने छापा मारून आरोपी श्रीराम वरपे यास मुलीसह ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात हजर केले. पोलीस चौकशीत श्रीराम वरपे याने या अल्पवयीन मुलीस लोणीकाळभोर (जि. पुणे) येथे नेऊन तिला एका रुममध्ये ठेवत चार महिन्यापासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार (Rape) केल्याचे पोलीस निष्पन्न झाले.

याप्रकरणी बलात्कार, पोस्को (Pocso) व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी श्रीराम वरपे यास केजच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 27 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!