accident … अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन तरुण ठार ; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारुर दि.12 जुलै – accident धारूर तालुक्यातील अंबेवडगाव जवळ खामगाव सांगोला राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर आज 12 जुलै बुधवार रोजी बारा वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले. या अपघातात एक तरुण जागीच तर एका तरुणाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ( Two youths killed in collision with unknown vehicle; Incidents in Dharur Taluka. )
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेलु तालुक्यातील झरी येथील दोन युवक आपल्या दूचाकी वरुन धारूरकडे Dharur येत होते. धारुर Dharur तालुक्यातील अंबेवडगाव येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास या दुचाकीस अज्ञात वाहनाने उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. सदर मृत तरुण हे परभणी जिल्ह्यातील झरी या गावचे असल्याची माहिती मिळाली. या अपघातस्थळी accident अपघातग्रस्त तरुणांना वेळीच मदत मिळाली नसल्याचे दिसून आले. अनेक वाहने जात येत असताना फक्त बघ्याची भूमिका घेतल्यामुळे तरुणांचे प्राण गेले. पंडित सुतारे (वय 38) व अनिल अडागळे अशी मयताची नावे आहेत.