पुन्हा अपघात… केज – कळंब रोडवर भरधाव बसने दुचाकीला उडवले; दुचाकीस्वार ठार.

केज दि.24 मे – रविवार व सोमवारी केज व धारुर तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्याजवळ मोटार सायकल आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात मोटर सायकलस्वाराचा मृत्यु झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, सोमवार (दि.23) सांयकाळी बिभीषण माणिक बचुटे (वय 35 रा. गोटेगाव ता. केज जि.बीड ) हे दुचाकी क्र.(एम एच-16/जी-1464) कळंब येथून गावाकडे येत होते. सायंकाळी आठच्या दरम्यान केज-कळंब रोडवरील सुर्डी फाट्याजवळ कळंबकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कळंब आगाराच्या बसने (क्र. एम एच-20/बी एल-0148) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला.
जखमी अवस्थेतील बिभीषण बचुटे याला चालक मकरंद घुले यांच्या सहाय्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला. बिभीषण बचुटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून हळहळ व्यक्त होत आहे.
रविवार व सोमवारी तीन अपघात…
रविवारी धारुर शहरात राष्ट्रीय महामार्ग 548 सी केज धारुर या रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने पादचारी शिक्षकाला उडवले. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर याच रात्री राष्ट्रीय महामार्ग 548 डी केज बीड रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार ठार ठार झाल्याची घटना घडली. या पाठोपाठ राष्ट्रीय महामार्ग 548 सी केज कळंब रस्त्यावर बस व दुचाकीची समोरासमोर धडक होवून एक जणांचा मृत्यू झाला.
( Accident again … The bus blew up the bike on Kaij – Kalamb Road; Two-wheeler rider killed. )