अपघात… पुन्हा ‘त्या’ दरीत भरधाव कार कोसळली; म्हसोबावाडी येथील घटना.

आष्टी दि.26 मे — बीडवरून पुण्याला निघालेल्या कार चालकांचा ताबा सुटुन कार म्हसोबावाडी फाटा येथील वळणावरील दरीत गेल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेसहा सातच्या सुमारास घडली. यातील जखमीची अद्याप माहिती मिळाली नसुन अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी फाटा येथील धोकादायक वळणावर आज सकाळी कार क्रमांक एम.एच.14 बी.के. 1742 या कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने कारवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळुन अपघात झाला. यात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन जखमीना अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या गाडीत किती लोक होते याची माहिती अद्याप समजली नाही.
14 दिवसापुर्वीच झाला चौघांचा मृत्यू…
दि. 11 मे रोजी रात्री पुण्याहून बीडकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटुन कार दरीत गेल्याने बीड येथील व्यापारी टेकवाणी या एकाच कुटुंबातील चार जणांचा मुत्यु झाल्याची घटना घडली होती. या घटनेला 14 दिवसाचा कालावधी उलटून जात नाही तोच पुन्हा एक कार दरीत गेल्याची दुसरी घटना घडली आहे.
बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी फाटा येथील सधारील धोकादायक वळण हे अपघाताचे कारण ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सदर अपघातप्रवण क्षेत्रावर उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.
( Accident … again the car crashed into ‘that’ valley; Incident at Mhasobawadi. )