व्हाट्सअप मध्ये होणार हे बदल….

व्हाट्सअप जगत- जगात सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या व्हाट्सअप Whatsapp सोशल मेडिया ॲपमध्ये दिवसेंदिवस वेगवेगळे बदल होत आहेत. जगभरात कोट्यवधी लोक व्हाट्सअपच्या माध्यमातून जूळले गेले आहेत. व्हाटसअप Whatsapp वरुन पाठवलेल्या संदेशाला आणखी सोयीचे करत नवीन अपडेट करण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेट मध्ये एखाद्या व्यक्तीला पाठवलेले चॅट chat वरील फोटो, व्हिडीओ आणि जीफ (JIF) फाइल्स पाठवल्यानंतरही डिलीट करता येणार आहेत.

चॅट chat करताना मिडिया फाइल्स पाठवल्यानंतर आणि त्या डिलेव्हर झाल्यानंतरही समोरच्या व्यक्तीच्या फोनमधील या फाइल्स डिलीट करण्याची सोय व्हाट्सअ‍प Whatsapp उपलब्ध करुन देणार आहे. या फिचरला एक्स्पायरिंग म्हणजेच नष्ट होणारं मिडिया फिचर असं म्हटलं जात आहे. एक्स्पायरिंग मिडिया फिचर वापरताना ‘व्ह्यू वन्स’ हा पर्याय निवडून फोटो, व्हिडिओ आणि जीफ gif चॅट chat पाठवता येणार आहे. असा पर्याय निवडून पाठवलेल्या फाइल्स समोरच्या व्यक्तीला केवळ एकदाच पाहता येतील. चॅट chat विंडो बंद केल्यानंतर हा संदेश आपोआप डिलीट होईल. “चॅट विंडो सोडल्यावर ही फाइल नष्ट होइल,” अशा स्वरुपाचा संदेश नोटीफिकेशन सहीत हे चॅट chat व्हाट्सअप Whatsup वर दिसतील. चॅट chat विंडोवर पुन्हा आल्यास पॉप अप नोटिफिकेशनच्या माध्यमातून, “व्ह्यू वन्स फोटो एक्स्पायर्ड” असं युझर्सला दर्शवलं जाईल. या चॅटचे chat स्क्रीनशॉर्ट देखील काढता येणार नाहीत. लवकरच सदरील अपडेट उपलब्ध होणार असून याबाबतची अंतिम चाचणी सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!