धारुर घाटात अपघात; दरीत ट्रक कोसळला, एक ठार.

किल्लेधारूर दि.31 मार्च – येथील घाटात एका अवघड वळणावर चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने 50 ते 60 फुट खोल दरील ट्रक कोसळल्याची घटना घडली असून ट्रकखाली येवून या अपघातात (Accident) ट्रक चालकाचा चिरडून मृत्यू झाला आहे.
(Accident in Dharur Ghat; The truck crashed into the valley, killing one.)
शहरापासून जवळ असलेल्या धारुर घाटात (Dharur Ghat) आज सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात (Accident) घडला. अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली.
सकाळी 11 च्या सुमारास ट्रक क्र. टि.एन 48 – झेड 5235 हा माजलगावकडे जात असताना हा अपघात झाला. धारुर घाटातील (Dharur Ghat) एका अवघड वळणावर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने 50 ते 60 फुट खोल दरीत ट्रक गेला. जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांतून ट्रकच्या टायरखाली येवून ट्रकचालक चिरडण्याचा अंदाज आहे. ट्रकमध्ये कसलेही साहित्य नसुन एमटी ट्रकमध्ये एकटा ट्रक चालक असल्याचाही अंदाज आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलिस घटनास्थळी बचाव कार्य करीत आहेत.