अंबाजोगाई – लातूर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरुच; दोन ठार सात जखमी.

अंबाजोगाई – लातूर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरुच; दोन ठार सात जखमी.
( Ambajogai May 01 – The road in front of Nand Gopal Dairy near Saigaon in Ambajogai taluka has become an accident prone area. At least two people were killed and seven others were injured when a two-wheeler collided head-on with a truck at the same place on Saturday night. )
अंबाजोगाई दि.01 मे – अंबाजोगाई तालुक्यातील सायगांवनजीक नंद गोपाल डेअरीसमोरचा रस्ता अपघातप्रवण क्षेत्र (accident prone area) बनला आहे. याच ठिकाणी शनिवारी रात्री (दि.30) दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात (Accident) दोघे ठार झाले असून काही अंतरावर एक इनेव्हा व ट्रकची धडक होवून सात जण जखमी झाले आहेत.
काही दिवसांपुर्वी अंबाजोगाई तालुक्यातील सायगावनजीकच्या नंद गोपाल डेअरीजवळ (Dairy) अपघात होऊन 8 ठार तर 10 जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. या अपघातास बारा तास उलटत नाही तोच दुसऱ्याच दिवशी रात्री 10 च्या सुमारास याच अंबाजोगाई-बर्दापूर रस्त्यावर पुन्हा अपघात (Accident) झाला होता. यापूर्वीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले असून हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे.
काल दि.30 शनिवार रोजी रात्री अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील सायगांवजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून दोघे दुचाकीचालक तरुण जागीच ठार झाले आहेत. श्रीराम राठोड आणि वाजिद बागवान असे मयतांची नावे आहेत. येथून जवळच बर्दापूरजवळ इनेव्हा व ट्रकची धडक होवून अपघात झाला. या अपघातात सात जण जखमी झाले असून यातील तीघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
अंबाजोगाई – लातूर या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 548 डी चे काम लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत चारपदरी व रस्ता दुभाजक आहे. तर बीड (Beed) जिल्ह्याची हद्द सुरु होताच रस्ता अरुंद होवून रस्ता दुभाजक (Road divider) काढण्यात आलेले आहे. यामुळे या अरुंद रस्त्यावर अपघाताची शृंखलाच सुरु आहे. यावरुन सध्या राजकीय जुगलबंदी सुरु असून हा रस्ता तात्काळ चारपदरी करुन रस्ता दुभाजक करण्याची मागणी जोर धरत आहे.
पालकमंत्री मुंडे यांचे गडकरींना साकडे.
अंबाजोगाई – लातूर (Ambajogai Latur) या राष्ट्रीय महामार्ग 548 डी चे काम लातूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत चारपदरी व बीड जिल्ह्याची हद्द सुरु होताच रस्ता अरुंद यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी एका कार्यक्रमात खासदारांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला होता. यानंतर या विषयी चांगलाच कलगीतुरा रंगला होता. कालच या विषयावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Guardian Minister Dhananjay Munde) यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी (Union Road Development Minister Nitin Gadkari) यांच्याकडे साकडे घालत रस्ता प्रश्न तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.
( A series of accidents on Ambajogai-Latur road continues; Two killed, seven injured. )