बीडच्या पर्यटकाचा चाकुरला अपघात; एक जण जागीच ठार तर पाच जखमी.

बीड/लातूर दि.18 जुन – बीड (Beed) जिल्ह्यातून चाकुरला गेलेल्या एकाच्या कारचा नांदेड महामार्गावरील लातूररोडजवळ अपघात (Accident) झाला. कार व टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
शिरूर कासार जि. बीड येथील शुभम सतिष चौरडीया हे चाकूर जि.लातुर येथील वॉटर पार्कमध्ये (Water Park) आले होते. तेथून सायंकाळच्या सुमारास लातूरकडे (Latur) जात असताना त्यांची कार व लातूरहून नांदेडकडे जात असलेल्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील विमलबाई पोपटलाल तत्तुर (वय 65, रा. लातूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.
जखमीमध्ये पुजा सौरभ शेठीया (वय 26, रा. संभाजीनगर) , प्राजक्ता संतोष लालवानी (वय 22, रा. भिगवन), निशा महेंद्र कोठारे (वय 22, रा. लातूर), सरिता सतिष चौराडिया (वय 27, रा. शिरुर कासार जि.बीड) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहे.
( Accident of a tourist’s car going from Beed to Chakur; One was killed and five were injured. )