माजलगाव रस्त्यावर पुन्हा अपघात; पिकअप – दुचाकीच्या धडकेत दोन सख्ख्ये भाऊ ठार.

माजलगाव दि.23 एप्रिल – माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची (Accident) शृंखला सुरुच आहे. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होवून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माजलगाव तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याजवळ मालवाहू पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (terrible accident) झाला. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही सख्ये भाऊ ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवार रोजी रात्री साडेआठ च्या दरम्यान घडली आहे.

पुणे येथून दुचाकीवरून दोन सख्ये भाऊ आपल्या गावी जात आसतांना छत्रपती साखर कारखान्या जवळ पिकप क्र.एम.एच.22 ए.व्ही.1066 व दुचाकी क्र.एम.एच.22 ए.टी.5411 यांच्या त समोरासमोर धडक होऊन सय्यद मिय्या पिंपळगाव ता.जिल्हा परभणी येथील माऊली पंढरी जावळे वय 25 व रवि पंढरी जावळे वय 24 दोन्ही सख्ये भाऊ ठार झाले आहेत.

माजलगाव मतदारसंघात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. मतदारसंघात दोन राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आहेत. तर मतदारसंघात तीन साखर कारखाने (Sugar factory) आहेत. यामुळे माजलगाव, धारुर (Dharur) व वडवणी या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते. अरुंद रस्ते व वाढलेली वाहतूक पाहता अपघात वाढले आहेत. गेल्या अठ्ठेचाळीस तासात मतदारसंघात वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा बळी गेला आहे.

( Accident on Majalgaon road again; Pickup – Two brothers killed in two-wheeler collision. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!