माजलगावात पुरुषाची तर केजमध्ये विवाहित महिलेची गळफास घेवून आत्महत्या.

माजलगाव/केज दि.16 जानेवारी – माजलगाव (Majalgoan) तालुक्यातील किट्टी आडगाव येथे एका पुरुषाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर केज (Kaij) तालुक्यातील जवळबन येथे एका 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.
(In Majalgaon, he committed suicide due to his wife’s troubles, while in Kaij, a married woman committed suicide.)
माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील ऊसतोड कामगार अनिल उत्तम थोरात या साठे नगरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने पत्नी व सासरच्या लोकांनी अपमान केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले. पत्नी व सासरच्या लोकांनी अपमान करत केलेली केस मागे न घेतल्यामुळे शनिवारी राहत्या घरात त्याने पंख्ख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली.
याप्रकरणी आज रविवारी (दि.16) मयत अनिल यांची आई महानंदा उत्तम थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पत्नी छाया, मामा सासरे विजू आत्माराम क्षीरसागर, चुलत भाऊ राहुल क्षीरसागर, संगीता अंकुश भिसे या चौघा विरुध्द माजलगाव ग्रामीण पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज तालुक्यात विवाहितेची आत्महत्या
केज तालुक्यातील जवळबन येथील गंगाबाई श्रीरंग करपे या 35 वर्षीय महिलेने आज रविवारी दुपारी गळफास घेत आत्महत्या केली. राहत्या घरात कोणीही नसताना दुपारी 12 ते 1 च्या सुमारास ओढणीने गळफास घेत विवाहितेने आपली जीवनयात्रा संपविली.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. प्रवीणा चंद्रकांत करपे यांच्या खबरीवरुन युसूफवडगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.