बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…. पहा काय आहे आजची परिस्थिती.

बीड दि.22 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत बाधितांची संख्या झपाट्याने वाढलेली संख्या आज आटोक्यात आली. आज गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडे 4411 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 160 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4251 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-31, अंबाजोगाई-3, आष्टी-55, धारुर-10, गेवराई-11, केज-13, माजलगाव-3, परळी-1, पाटोदा-14, शिरुर-12, वडवणी-7 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची कालची संख्या सर्वाधिक होती. आजची संख्या उतरलेली दिसत असली तरी आरोग्य विभागाची चिंता वाढलेली आहे. जिल्हा प्रशासनाने चार तालुक्यात निर्बंध कडक करण्याचे आदेश दिली आहेत. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 8 हजार 159 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 839 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 लाख 08 हजार 750 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी 165 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 30 हजार 918 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.33 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!