धारुरच्या जिल्हा बँकेत कार्यरत पिंगळे यांचे अपघाती निधन; वॉकींग करताना जीपची धडक.

कळंब दि.25 जुलै – सायंकाळी कळंबकडून डिकसळच्या दिशेने फिरायला निघालेल्या दोघांना भरधाव वेगाने आलेल्या क्रुजर गाडीने धडक देऊन पलायन केले. या अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ जखम झाली आहे. मयत अण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे हे पाच वर्ष धारुर (Dharur) येथील जिल्हा बँकेच्या (DCC Bank) शाखेत काम केले होते.

(Accidental death of Pingale working in District Bank of Dharur; Jeep hit while walking.)

मूळ पाथर्डी येथील रहिवासी असलेले व सध्या डिसकळ भागातील संभाजी नगर येथे राहणारे अण्णासाहेब बाबासाहेब पिंगळे वय अंदाजे 47 हे दररोज सायंकाळच्या वेळेस डिकसळ रोडने फिरायला जात होते. रविवारी संध्याकाळी देखील ते रोजच्या प्रमाणे आपल्या मित्रासोबत फिरायला निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला.

सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान राजधानी हॉटेलच्या समोर अज्ञात क्रुजर गाडीने त्यांना धडक दिली. या धडकेत पिंगळे 100 फूट लांब जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागले. तर त्यांच्यासोबत असलेल्या एकाला किरकोळ दुखापत झाली. या अपघातात पिंगळे यांचे निधन झाले. पिंगळे हे धारुर (Dharur) येथील जिल्हा बँकेच्या (DCC Bank) शाखेत तपासणीस व शाखाधिकारी म्हणून पाच वर्ष कार्यरत होते. तर धारुरहुन बदली होवून सध्या ते काळेगाव ता. केज शाखेत कार्यरत होते. यामुळे शहरात त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!