घात-अपघात

धारुर तालुक्यातील दोघांचे अपघाती निधन ; पाच जण जखमी.

49 / 100

किल्लेधारुर दि.9 सप्टेंबर – धारुर तालुक्यातील दोघांचे अपघाती निधन झाल्याची घटना परभणीजवळ (Parbhani) घडली. दारु सोडविण्यासाठी गेलेल्या बचाटे कुटुंब परत गावाकडे येताना गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपूरी जवळ वाहनाचा अपघात झाला. याता दोघे जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. यातील तिघे गंभीर जखमी असून दोघांवर परभणी तर एकावर लातूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
( Accidental death of two in Dharur taluka; Five people were injured.)

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, धारुर तालुक्यातील उमरेवाडी येथील बचाटे कुटूंबातील एका व्यक्तीची दारु सोडविण्याचा इंजेक्शन घेण्यासाठी खाजगी वाहन करुन परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथे गेले होते. इंजेक्शन घेऊन परत उमरेवाडी ता.धारुर (Dharur) येथे येत असताना ब्रह्मपूर ( जि. परभणी ) जवळ वाहनाचा अपघात झाला. रस्त्यावर असलेला बंधारा अचानक दिसल्यामुळे भरधाव वाहनावरचा चालकाचा ताबा सुटला. यामुळे वाहन पलट्या खात रस्त्याच्या खाली जाऊन भीषण अपघात घडला. या भीषण अपघातात अशोक ( बाबुराव ) अर्जून बचाटे रा. उमरेवाडी ( ता. धारुर ), जयश्री सचिन बचाटे रा. उमरेवाडी ( ता. धारुर ) या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर सचिन भास्कर बचाटे, भास्कर रामभाऊ बचाटे, दिनकर बालासाहेब बचाटे सर्व रा. उमरेवाडी ( ता. धारुर ), दादासाहेब भोसले रा. शिंगणवाडी ( ता. धारुर ) व चालक ( नाव समजले नाही ) हे पाच जण जखमी झाले.

अपघातात सचिन बचाटे, भास्कर बचाटे आणि दादासाहेब भोसले हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सचिन व भास्कर या दोघांवर परभणी (Parbhani) येथे उपचार सुरू आहेत. तर दादासाहेब भोसले यांना लातूर येथे हलविण्यात आले आहे. चालक व इतर एकजण किरकोळ जखमी आहे. अपघाताची (Accident) बातमी कळताच उमरेवाडी व परिसरावर शोककळा पसरली. आज शुक्रवारी ( दि. 9 ) सकाळी 11 च्या सुमारास दोघाही मयतांवर उमरेवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपा नेते रमेश आडसकर (Ramesh Adaskar), यांच्यासह रुई धारुर, आसरडोह सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्याने व दोघं गंभीर असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!