माझं गाव

धारुरच्या रुपेश ज्वेलर्सवर तहसीलदारांची कारवाई; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये.

किल्लेधारूर दि.26 मे – गेल्या काही दिवसात धारुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) आढळून येत असून अनेक तक्रारीनंतर आज प्रशासन ॲक्शन मोडमध्ये (action mode) आल्याचे आज दिसुन आले. शहरातील प्रसिद्ध रुपेश ज्वेलर्सवर महसुल विभागाकडून तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी दंडात्मक कारवाई करत दुकान सिल केल्याने खळबळ उडाली आहे.

(Action of tehsildar against Rupesh Jewelers of Dharur; Administration in action mode.)

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून जिल्हा रेड झोनमध्ये आहे. यामुळे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शासनाकडून निर्बंध सहा दिवस वाढवण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊन (lockdown) वाढवूनही अनेक दुकाने सर्रास कायद्याची पायमल्ली करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेत आज तहसीलदार वंदना शिडोळकर यांनी स्वतः शहरात फिरुन कारवाईचा बडगा उगारला. शहरी भागात त्या स्वतः सर्व भागात फिरुन कारवाई करत आहेत.

आज धारूर (Dharur) शहरात महसूल, न.प. व पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त कार्यवाही करण्यात येत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 5 विविध दुकाने सील करून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणारांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. ग्रामीण भागात गटविकास अधिकारी कांबळे स्वतः पथकासमवेत फिरत आहेत.

यावेळी तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील ध्वनीक्षेपकातून प्रशासनाच्या वतीने केले. नागरिकांसह काही व्यापाऱ्यांकडून नियमांचं पायमल्ली केली जात असल्याचे दिसून आले. अशा बेजबाबदारांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

कोविड नियमावलीचे पालन न केल्याने धारुर नगरपरिषदेच्या भरारी पथकाने मुख्याधिकारी नितिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी दुकाने सिल करत काही दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात रुपेश ज्वेलर्स, ठोंबरे पान स्टॉल, रुषीकेश हार्डवेअर या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत पान टपरी व ज्वेलर्सची दुकान पुढील आदेशापर्यंत सिल करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडूनही कारवाई…
पोलिस (Police) प्रशासनाकडूनही दंडात्मक कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन (lockdown) काळात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी धारुर व आडसमध्ये मोटार व्हिकल ॲक्टनूसार 41 जणांवर कारवाई केली. सहाय्यक पोलिस निरिक्षक कानिफनाथ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 हजार 200 रुपंयाचा दंड वसूल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!