धारुर तालुक्यातील आदर्श गाव व शहरातील ही गल्ली कोरोनाच्या विळख्यात ….

किल्लेधारूर दि.15 एप्रिल – शहरातील हनुमान गल्ली व तालुक्यातील आदर्श ग्राम आवरगावात (Adarsh ​​village Awargaon) गेल्या 24 तासात अनेक कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. यामुळे हि दोन्ही ठिकाण कोरोनाचा हॉटस्पॉट (Hotspot) ठरत असल्याने आरोग्य विभागाकडून कॉन्टॕक्ट ट्रेसिंग सुरु करण्यात आली आहे.

(Adarsh ​​village in Dharur taluka and this street in the city is in the vicinity of Corona ….)

धारुर तालुक्याची आज जिल्हा प्रशासनाने आकडेवारी जाहिर केली. यात गेल्या 24 तासाची कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 41 आहे. ज्यात गतवर्षी कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या  तालुक्यातील आदर्श गाव आवरगाव येथील 11 कोरोना बाधितांचा तर शहरातील हनुमान गल्लीतील 4 बाधित रुग्णांचा समावेश आहे. हनुमान गल्लीत गेल्या दहा दिवसांत सात कोरोना बाधित आढळलेली आहेत. यात वाढ होवून आता संख्या 11 झाली आहे.

प्रामुख्याने धारुर शहरातील कटघरपुरा, लक्ष्मी नगर, वीर पांडूरंग चौक व हनुमान गल्ली या गल्ल्यांत कोरोना बाधितांची संख्या अधिक आढळून आलेली आहे. तर तालुक्यातील मोहिखेड, कारी, कोळपिंपरी, रुईधारुर व अंबेवडगाव नंतर आता आसरडोह व आवरगाव या गावांचा समावेश हॉटस्पॉटमध्ये (Hotspot) होत आहे. काल आसरडोह येथे पाच बाधित आढळली होती. ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.

धारुर येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) सध्या सर्व बेड पुर्ण क्षमतेने भरली आहेत. येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) 115 कोरोना बाधित उपचारासाठी दाखल आहेत. दि.14 बुधवारी कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे चिंता वाढली आहे. 23 बाधितांना उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आलेले आहे तर 23 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. 19 सौम्य लक्षणे असणारे बाधित गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.

सध्या कोरोना संक्रमण ग्रामीण भागात वाढला असल्याचे दिसत आहे. एकाच दिवसात 11 कोरोना बाधित आदर्श गाव आवरगावात (Adarsh ​​village Awargaon) आढळल्यामुळे गावात शनिवारी ॲन्टीजन तपासणी शिबिराचे आयोजन आरोग्य प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील अनेक गावात सध्या रुग्ण संख्या 5 पेक्षा जास्त झालेली आहे. आरोग्य विभागाने सदरील गावांची माहिती पंचायत विभागाला देवून उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हॉटस्पॉट ठरणाऱ्या गावात कंटेनमेंट झोन (containment zone) करण्याचे अधिकार पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना आहेत. सध्या मोहिखेड, आवरगाव, आसरडोह, कोळपिंपरी, कारी व अंबेवडगाव या गावात बाधित अधिक आढळून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!