आडस धारुर वडवणी पिंपळनेर पाडळसिंगी रस्त्याच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात; आ. सोळंकेच्या प्रयत्नांना यश.

किल्ले धारूर दि.27 मे – धारूर (Dharur) वडवणी व आडसहून जाणाऱ्या पाडळसिंगी ते लोंखडी सावरगाव राज्य रस्ता क्रमांक 232 या रस्त्याचे काम तात्काळ व्हावे या साठी माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशराव सोंळके (Prakash Solanke) यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानंतर दि.25 मे रोजी या अनुषंगाने राज्य शासनाने बांधकाम विभागास नवीन आदेश काढले असून प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
अनेक प्रमूख शहरांना जोडणाऱ्या राज्य रस्ता क्रमांक 232 गेल्या काही वर्षात राष्ट्रीय महामार्गात (National Highway) रुपांतरीत होणार याची चर्चा होती. सदर रस्ता हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत मंजूर होवून तत्वतः राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. आता राज्य शासनाने पॕकेज क्र. AU 117 व AU 123 अंतर्गत कामाचे नवीन दरसुचीनूसार अंदाजपत्रक तयार करण्याची मान्यता दिली आहे.
या रस्त्यासाठी पत्रकारांनी थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही साकडे घातले होते. मात्र या रस्त्याचा विकास शासनाच्या लाल फितीत अडकून दुर्लक्षितच राहिला आहे. या रस्त्याचा बराच भाग माजलगाव (Majalgoan) मतदारसंघात असल्याने आमदार प्रकाशराव सोळंके यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत पाठपुरावा केला. या नियोजित रस्त्यामुळे अनेक प्रमुख शहरे जवळच्या अंतराने जोडली जाणार असून विकासाला चालना मिळणार आहे.
पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव हा 85 कि.मी. चा रस्ता आहे. लातूर, औरंगाबाद, अहमदनगर आदी शहरांना जोडणारा हा रस्ता आहे. राज्यमार्ग म्हणून या रस्त्याचे काम पुर्वी होणार होते. मात्र हा राष्ट्रीय महामार्ग झाल्याने राज्य शासनाने या रस्त्या वरील निधी रद्द केला. त्यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते व या 85 कि मी रस्त्याचे दुरावस्थेला प्रवाशी वैतागले होते.
2017 मध्ये या रस्त्याचे 171.36 कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र पाच वर्षात वस्तूचे दर वाढल्याने हे पुर्ण काम 252.83 कोटी रुपयाचे झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) राज्य रस्ता क्रमांक 232 चे पाडळसिंगी ते आडस पर्यंत 65 कि.मी चे काम पुर्वी बनवलेल्या 171.36 कोटी रुपयात होऊ शकते. या रस्त्याची डांबरीकरणाची लांबी सात मिटर तर दोन्ही बाजूने दिड मिटर माती काम असे 10 मिटरचा रस्ता होणार आहे.
या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या रस्त्यासाठी फक्त 23.90 कोटी रुपये निधीची तरतूद 2020-21 च्या अर्थसंकल्पात केली आहे. हा निधी अपूरा असल्याने वाढीव निधीची मागणी बांधकाम विभागाने केली आहे. प्रशासकीय मान्यता मिळून हे काम अंदाजपत्रक मंजूरीचे प्रक्रीयेत होती. या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यअभियंता दि. द. उकिडे यांनी वरीष्ठ कार्यालयास पत्रयवहार केला आहे.
या रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे तात्काळ सर्व निधी द्यावा या बाबत या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्रकाशराव सोंळके यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर दि.25 मे रोजी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकामच्या उस्मानाबाद विभागास हायब्रीड ॲन्युईटी योजनेच्या अनुषंगाने शासन निर्णय व सुचनांचे पालन करुन विहित कार्यपद्धतीन्वये उचित कारवाईचे आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता निविदा प्रक्रिया होवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासुन रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
( Adas Dharur Vadvani Pimpalner Padalsinghi Road tender process started; Come on. Sulanke’s success. )