मध्य रेल्वेत आज पासून मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी भरती…

मुंबईः दि.६ – मध्य रेल्वेच्या रेल्वे (Railway) भरती विभागाने नव्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. अप्रेंटिस (Apprentice) च्या पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. रल्वेने यासाठी 6 फेब्रुवारीपासून अर्ज मागितले असून पात्र उमेदवारांना रेल्वेच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. (Central Railway Recruitment 2021)
कोरोनामुळे थंडावलेली विविध विभागाच्या नोकर भरती प्रक्रिया हळूहळू पुर्वपदावर येत आहे. केंद्र व राज्य सरकारने आता नव्याने ही भरती सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस (Apprentice) भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ५ मार्च २०२१ पर्यंत असणार आहे. यासाठी रेल्वेच्या rrccr.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. रेल्वेनं (Railway) एकूण २५३२ पदांसाठी जाहीरात काढली असून यामध्ये वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी ही भरती होत आहे.