कौतूकास्पद … 57 जम्बो सिलेंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द; पालकमंत्र्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद.

बीड दि. 02 मे – शनिवारी बीड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सुचवल्याप्रमाणे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य सर्व अधिकारी तसेच जिल्हा परिषदेशी संलग्न असलेले अभियंते यांनी लोकसहभागातून बीड जिल्हा रुग्णालयास 100 ऑक्सिजन जम्बो सिलेंडर (Oxygen jumbo cylinder) देण्याचा निर्धार केला. त्यानुसार आज 57 जम्बो सिलेंडर आणून ते जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले आहेत. तर उर्वरित 43 सिलेंडर देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांनी दिली आहे.
(Admirable … 57 Jumbo Cylinder handed over to District Hospital; Response to the concept of Guardian minister.)
पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, तसेच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांच्या संकल्पनेतून ही बाब साकारली आहे. शासकीय आयटीआय येथेही आणखी एक कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही या सिलेंडर्सचा उपयोग होणार आहे.
एकीकडे रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा आहे तर दुसरीकडे विविध जनरेशन प्लांट वर व आयात केलेल्या ठिकाणी ऑक्सिजन भरून ठेवण्यासाठी सिलेंडर कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत हे 57 जम्बो सिलेंडर (Oxygen jumbo cylinder) निश्चितच आरोग्य यंत्रणांसाठी फायदेशीर ठरणार आहेत, आणखी 43 जम्बो सिलेंडर लवकरच उपलब्ध करून देऊ; असे जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद प्रांगणात आज हे 57 जम्बो सिलेंडर जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, महिला व बालकल्याण समिती सभापती यशोदा जाधव, कृषी व पशु संवर्धन समिती सभापती सविता मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, शिवाजीराव सिरसाट, बाळासाहेब मस्के, जि.प. सदस्य अशोक लोढा, विठ्ठल थडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, रामेश्वर मुंडे, भागवत औताडे, रणजित क्षीरसागर यांसह आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या कोरोना संकट भयानक रुप घेत असुन दिवसेंदिवस जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्हा परिषदेने सामाजिक बांधिलकी जपत हाती घेतलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.