चार वर्षाच्या रोटरी क्लबची कौतूकास्पद कामगिरी…

किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) येथील रोटरी (Rotary) क्लब ऑफ धारूर (Dharur) सिटी चा मंगळवारी अंबाचोंडी (Ambachondi) मंदिरात पदग्रहण सोहळा पार पडला. या वेळी येथे कोविड (Covid-19) काळात आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पत्रकार, डॉक्टर, पोलीस, विद्युत कर्मचारी, रुग्णवाहिका चालक व इतर व्यक्तींचा कोविड योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. धारुर रोटरी (Rotary) क्लबची स्थापना चार वर्षापूर्वी २०१६ मध्ये झाली. केवळ चार वर्षात या क्लबने अनेक लोकोपयोगी कौतूकास्पद कार्य केले.

१९०५ ला पॉल हॕरिस यांनी सामाजिक कार्याच्या हेतूने सुरु केलेल्या मूळ सामाजिक संस्थेने रोटरी (Rotary) क्लब नाव धारण करत हळूहळू आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. भारतातही रोटरी क्लबच्या शाखा छोट्या छोट्या शहरापर्यंत स्थापित झाल्या. प्रतिवर्षी नवीन ब्रिद घेवून कार्य करणाऱ्या रोटरीने यंदा रोटरी संधी उपलब्ध करते (Rotary opens opportunity) हे ब्रिद धारण केले आहे. शहरात सुमारे चार वर्षापूर्वी स्थापन झालेल्या रोटरी क्लबचा यंदाचा पदग्रहण सोहळा येथील अंबाचोंडी (Ambachondi) माता मंदिर परिसरात मंगळवारी झाला. या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष संजित कोमटवार, सचिव सतीश पिलाजी यांनी प्रमुख पाहुणे रो.डी.जी. हरिषजी मोटवानी, विशेष उपस्थिती रो . निरंजन वाघमारे, रो . प्रा. हनुमंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष व सचिवांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर स्‍वरूपसिंह हजारी , रोटरी क्लब ऑफ धारूर सिटी चे माजी अध्यक्ष, डॉ तुकाराम मुंडे, अमोल गुळवे इत्यादी उपस्थित होते.

गेल्या चार वर्षात धारुर रोटरी क्लबने कँसर रोग निदान (Cancer disease) शिबीर, नेत्र रोग (Eye disease) शिबीर, ॲक्यूपंक्चर (Acupuncture) शिबीर, डॉ. हिरेमट, डॉ. विठ्ठलराव लहाने, अपर्णाताई रामतीर्थकर, डॉ. जर्रा काझी यांचे व्याख्यानाची कार्यक्रम आयोजित केली. प्रतिवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण कार्यक्रम घेणे. शहराची एक महत्वाची गरज असलेले अंत्यसंस्कार वाहन वैकुंठ रथ उपलब्ध करण्यासह कोविड-१९ (covid-19) प्रादुर्भाव काळात मेडिकल किट वाटप केली. यासोबतच नुतन पदग्रहण सोहळ्यात रोटरीने अॉक्सिजन मशिन उपलब्ध केली आहे. याच कार्यक्रमात रोटरीच्या वतीने कोविड काळात अत्यंत महत्वाची कामगिरी करणाऱ्या पत्रकार, डॉक्टर, पोलीस, विद्युत कर्मचारी, रुग्णवाहिका चालक व इतर व्यक्तींचा कोविड (covid-19) योद्धा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. केवळ चार वर्षाच्या कार्यकाळात रोटरीने कौतूकास्पद कामगिरी केली. धारुर रोटरीचे नुतन अध्यक्ष संजित कोमटवार यांनी आगामी वर्षातही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत रोटरीचे कार्यात भर घालणार असल्याची प्रतिक्रिया बीड२४ शी बोलताना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!