हिवरेबाजार, राळेगणसिद्धी नंतर बीड जिल्ह्यातील आवरगाव हे आदर्श गाव- अजित कुंभार

किल्लेधारुर दि.5 मार्च (वार्ताहर)- स्व. आर आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या धारूर तालूक्यातील आवरगाव येथे बीड (Beed) जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांनी भेट देऊन गावातील कामांचे कौतूक करून हे गाव आगामी काळात हिवरेबाजार, राळेगणसिद्धी सारखे आदर्श बनेल असा विश्वास व्यक्त केला.

(After Hivrebazar, Ralegan Siddhi, Awargaon is the ideal village in Beed district – Ajit Kumbhar)

तालूक्यातील  आवरगाव ग्रामपंचायतीने आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या गावास जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांनी  भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, व्यायामशाळा, वाचनालय, क्रीडांगण, वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिर, रस्ते आदीसह सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. सार्वजनिक ठिकाणांसह गाव स्वछतेच्या नियोजनासह इतर कामांवर अजित कुंभार यांनी भेट दिली.

या भेटीत अजित कुंभार यांनी वरील सर्व सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करत आनंद व्यक्त करुन केलेल्या कामाचे कौतुक केले. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना हे गाव राज्यात आदर्श बनेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विशेषतः गावाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या सरपंचपूत्र युवानेते अमोल जगताप यांच्यासह गावकऱ्यांचे त्यांनी कौतूक  केले. याप्रसंगी सुनील शिंदे, आगळे, माने, अमोल जगताप, ग्रामसेवक बालासाहेब झांबडे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

आदर्श गाव बनेल – कुंभार 

आवरगाव पाहिल्या नंतर आनंद वाटला खरच तुम्ही खूप छान कार्य केलेले आहे , बीड जिल्ह्यात सुद्धा  हिवरेबाजार, राळेगणसिद्धी (Hivrebazar, Ralegan Siddhi) यांच्या सारखे आवरगाव हे गाव आहे. हे गाव पाहण्यासाठी बाहेरून लोक येतील असे आपलं गाव तयार झालेले आहे. तरी सातत्य ठेवा व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावीत असे जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ग्रामस्थांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!