पहा बीड जिल्ह्याची आजची कोरोनास्थिती; धारुर, केज व वडवणीसह तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.27 एप्रिल- बीड (Beed) जिल्ह्यातील 4397 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 1297 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3100 जण निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान, राज्यात काल दिलासा मिळाला असून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त दिसुन आली.
(Today’s corona status of Beed district; Taluka wise statistics including Dharur, Kaij and Wadwani.)
आज बेचाळिसाव्या दिवशी बीड तालुक्यात 313 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 206, आष्टी तालुक्यात 138 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 52 तर केजमध्ये 171 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-313, अंबाजोगाई-206, आष्टी-138, धारुर-52, गेवराई-84, केज-171, माजलगाव-44, परळी-85, पाटोदा-77, शिरुर-82, वडवणी-45 अशी आहे.
कोविड-19 (covid-19) च्या विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक अख्ख्या देशभर वाढलेला आहे. राज्यापाठोपाठ बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हजाराच्या आत असणारी आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून हजाराचा टप्पा पार ओलांडत आहे. काल दि.26 सोमवारी जिल्ह्यातील 952 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात (Maharashtra) 48 हजार 700 नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळले असून 524 जणांच्या मृत्यूची (Corona Death) नोंद झाली आहे. तर 71 हजार 736 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Death Rate) 1.5 टक्के एवढा आहे. तर बीड जिल्ह्याचा मृत्यूदर (Death Rate)1.76 टक्के आहे.