धारुरमध्ये भाजपा व शिवसेनेकडून आंदोलन….. पहा कशासाठी केले आंदोलन

किल्लेधारुर दि.५ (वार्ताहर) आज धारुर शहरात शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल, गँस चे भाव विरोधात मोटार सायकल ढकलत निदर्शने करुन निषेध आंदोलन तर भाजपाच्या वतीने येथील महावितरणच्या कार्यालयाच्या आवारात टाळे ठोकुन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस आदी जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ केल्याने सर्व सामान्य  कष्टकरी, शेतकरी, मजुर, महिला यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याबाबत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तहसीलदार वंदना शिडोळकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना (Shiv Sena) तालुका प्रमुख नारायण कुरुंद मा.तालुका प्रमुख विनायक ढगे, शहर प्रमुख बंडु शिनगारे, माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे, राजकुमार शेटे, बंडु सावंत, बाबा सराफ, सुधीर गुळवे, बालाजी शिंदे, नितिन सद्दिवाल, सुनिल भांबरे, बाबा तिबोले, पुरुषोत्तम सोळंके, गणेश पवार, शरद उबाळे, विशाल सराफ, नितीन राऊत, विक्की घोडके सह शिवसैनिक उपस्थितीत होते.

भाजपाचा महावितरणवर हल्लाबोल

दुसरीकडे राज्य शासनाच्या महावितरण कडून सामान्य जनतेची लूट होत असल्याने राज्य सरकार विरुध्द भाजपाने (BJP) महावितरण कार्यालयाला टाळे लावत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर महावितरणच्या कार्यालयाच्या आवारात टाळा ठोकुन हल्लाबोल करण्यात आला. यावेळी भाजपा (BJP) तालुकाध्यक्ष ॲड.चोले, कृ.उ.बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे, बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय धोतरे, अर्जून तिडके, बालाजी चव्हाण, ॲड.मोहन भोसले, ॲड. नवनाथ धुमाळ, चोखाराम गायसमुद्रे, शिवाजी मायकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!