माजलगाव शहरात अग्नितांडव; तेल पॅकिंग करणाऱ्या युनिटला आग, करोडोची हानी.

माजलगाव दि.15 एप्रिल- माजलगाव येथील नवीन मोंढयात असलेल्या तेल पँकिंग (Packing material) करणाऱ्या युनिटला गुरुवारी पहाटे अचानक आग लागल्याने यात करोडो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला (Fire brigade) पाचारण करण्यात आले आहे.
(Agnitandav in Majalgaon city; Fire at oil packing unit, loss of crores.)
येथील नवीन मोंढ्यात संतोष अब्बड यांच्या मालकीच्या महावीर ट्रेडिंग कंपनी मध्ये गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने याठिकाणी असलेल्या खाद्यतेलाचे व त्याचे पॅकिंग मटेरियल (Packing material) पूर्णतः जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
ही आग विझविण्यासाठी व्यापाऱ्यांनी मोठी कसरत करून विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग तेलामुळे जास्त भडकू लागली. ज्या ठिकाणी आग विझविण्यासाठी माजलगाव नगरपालिका, सोळंके कारखाना, गेवराई नगरपालिका आदी ठिकाणाहून अग्निशामक दल (Fire brigade) येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. या आगीत करोडो रुपयांची हानी झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.