अहो आश्चर्य … कोविशिल्ड लस घेतल्यानंतर शरीर बनले चूंबक; महाराष्ट्रात खळबळ.

मुंबई दि.10 जून – कोविशिल्ड लस घेतल्यानंतर शरीराला चमचे तसंच नाणी चिटकत असल्याचा 71 वर्षीय अरविंद सोनार यांचा व्हिडीयो सोशल मीडियावर (social media) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर अंधश्रद्धेला वाव मिळू नये यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Anti-Superstition Committee) याची तातडीने पाहणी केली आहे. तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत.
(Ah surprise … the body became a magnet after taking the Covishield vaccine; Excitement in Maharashtra.)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Anti-Superstition Committee) पाहणीनंतर यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अंनिसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांच्या म्हणण्याप्रमाणे, ही घटना म्हणजे अंधश्रद्धा किंवा दैवीशक्ती नाही. यामागील वैज्ञानिक कारण हे न्यायवैद्यकशास्त्र समजून घेऊन पुढे आणलं पाहिजे. या दृष्टीने आम्हीही प्रयत्न करणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
सोनार यांच्या शरीराला वस्तू चिटकतायत हे खरं.
चांदगुडे पुढे म्हणाले, “यापूर्वी देखील अशी प्रकरण समोर आली आहेत. अशा गोष्टीची नोंद गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आलीये. त्यामुळे हा काही दैवी चमत्कार नाहीये.” अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, विज्ञानाचे नियम हे सार्वत्रिक असून यामागे जे वैज्ञानिक कारण असेल ते समोर येण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे लोकांनी या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. या घटनेनंतर लस घेण्यास कोणीही नकार देऊन नये.”
दरम्यान या घटनेवर वैद्यकीय क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, लसीकरणाचा (vacccination) या गोष्टीशी संबंध जोडणं संपूर्णपणे चुकीचं आहे. शरीराला चुंबकत्व निर्माण होणं आणि लसीकरणाचा (vacccination) काहीही संबंध नाही. आपण कोटी लोकांचं लसीकरण केलं असल्याने हे त्याच्याशी संबंधित नाही.”
काय आहे प्रकार.
नाशिकच्या सिडको भागात राहणारे अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष करून सोनार यांनी कोरोनाची लस (corona vaccine) घेतल्यावर हा प्रकार त्यांच्याबाबतीत घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
लस घेतल्यानंतर धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकल्या
अरविंद सोनार यांच्या शरीरावर कुठल्याही धातूच्या वस्तू थेट चिटकत असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. याचा व्हीडीओ सोशल मिडियात (social media) व्हायरल झाल्यावर माध्यमांनी याचा पाठपुरावा केला. यावेळी कोविशिल्ड लसीचे दोन डोस (Corona vaccine) घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या. असे सोनार यांनी सांगितले. यावेळी सोनार यांनी वस्तू स्वतःच्या अंगाला चिकटवून सुध्दा दाखवल्या.
याबाबत बोलताना अरविंद सोनार यांनी “मी लस घेतल्यानंतर हा प्रकार घडतो आहे. यापूर्वी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही वस्तू माझ्या अंगाला चिटकत नव्हत्या. हा नक्की काय प्रकार आहे? याबद्दल मी डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे”
या प्रकाराची चौकशी होईल – राजेश टोपे
वैद्यकीय चाचण्या करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, यामागे नक्की काय आहे, ते तपासले जाईल. मेडिकल कारण काय आहे, हे तपासू या. त्यानंतर नक्की कशामुळे हे झाले आहे, ते पाहू.
डॉक्टर म्हणतात..
“त्यांनी ज्या खासगी रुग्णालयात लस घेतली आहे, त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा. मात्र असा प्रकार घडल्याचा यापूर्वी कुठलाही विषय आलेला नाही” – उमेश मराठे, लाईफ केअर हॉस्पीटल, संचालक