अहो आश्चर्य…. महिलेने दिला 9 बाळांना जन्म; जगातील दुर्मिळातील दुर्मिळ घटना.

माली दि.5 मे – आफ्रिकन देश माली (African country Mali) येथील महिलेने मोरोक्कोमध्ये 9 मुलांना जन्म दिल्याची जगातील अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ घटना (The rarest event in the world.) घडली आहे. माली सरकारने एक निवेदन जारी करत, माता आणि मुले सर्व निरोगी व स्वस्थ असल्याचे जाहिर केले. मात्र मोरोक्को (Morocco) प्रशासनाने अद्याप या घटनेची पुष्टी केली नाही. तत्पूर्वी, माली सरकारने 25 वर्षीय हलिमा सिस्सेला 30 मार्च रोजी मोरोक्को येथे योग्य उपचार मिळावे म्हणून पाठवले होते.
(Ah surprise …. woman gave birth to 9 babies; The rarest event in the world.)
माली सरकारने २५ वर्षीय हालीमा सिसी या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळावल्यात म्हणून पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयामध्ये ३० मार्च रोजी दाखल केलं होतं. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सुरूवातीला वाटले होते की महिलेच्या पोटात 7 लेकरं आहेत. पण तिने 9 बाळांना जन्म दिला आहे.
आतापर्यंत एकत्र 6 मुलांना यशस्वीपणे जन्म देण्याच्या घटनेला दुर्मिळ मानले जात होते. परंतु आता या महिलेने 9 बाळांना जन्म दिला आहे. दरम्यान, मोरक्कनच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते रचिद कौधारी म्हणाले की, त्यांना देशातील रुग्णालयात इतक्या मुलांना जन्म देण्याच्या घटनेची माहिती नाही.
दुसरीकडे मालीच्या (African country Mali) आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की हलिमाने सीझेरियन (Cesarean) माध्यमातून 5 मुली आणि 4 मुलांना जन्म दिला आहे. देशाच्या आरोग्यमंत्री फांता सिबी म्हणाल्या, ‘माता व मुले अजूनही निरोगी व ठणठणीत आहेत.’ त्या म्हणाल्या की, या महिलेबरोबर माली येथील डॉक्टरही आले आहेत आणि ते क्षणो क्षणी माहिती देत आहेत. फांता यांनी सांगितले की, पुढच्या काही आठवड्यांनंतर हलीमा आणि तिच्या मुलांना परत देशात आणले जाईल.
दरम्यान, स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी हलिमाच्या प्रकृतीविषयी आणि मुलांच्या जीवनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मालीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की दोन्ही देशांच्या सुरुवातीच्या अल्ट्रासाऊंडमध्ये हलिमाच्या पोटात 7 बाळं असल्याचे निष्पन्न झाले होते. पण तिने एकूण 9 बाळांना जन्म दिला आहे. या यशस्वी मोहिमेबद्दल सिबी यांनी माली आणि मोरोक्कोच्या (Morocco) आरोग्य संघाचे अभिनंदन केले.