केज तालुक्यात घडली हृदयद्रावक घटना… पिण्यासाठी पाणी आणने महिलेच्या जीवावर बेतले.

केज दि.7 डिसेंबर – पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका 28 वर्षीय महिलेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू (Drowning) झाल्याची हृदयद्रावक घटना केज (Kaij) तालुक्यातील लव्हुरी येथे घडली. ज्योती ज्ञानेश्वर चाळक असे शेततळ्यात बुडून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
(A heartbreaking incident took place in Kaij taluka…. Woman dies after drowning in farm pond.)
लव्हुरी येथील ज्ञानेश्वर चाळक यांच्या शिवारातील शेत सर्वे 198 मध्ये त्यांची पत्नी ज्योती ज्ञानेश्वर चाळक (वय 28) या सोमवारी (दि.6) रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या. त्या शेततळ्यावर (farm pond) पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेल्या. मात्र शेततळ्यातून पाणी काढीत असताना त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच केज पोलिस (Police) ठाण्याचे जमादार चाँदपाशा सय्यद, पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बाजाच्या साहाय्याने ज्योती चाळक यांचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
मयत ज्योती चाळक या महिलेस दोन मुले आहेत. राजाभाऊ बजरंग चाळक यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत. सदरील घटनेमुळे लव्हूरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.