Ajit Pawar “लाडक्या” बहिंणीसाठी अजित पवारांची माजलगावात नवी घोषणा.

माजलगाव दि.1 आक्टोंबर – आज दि.1 आक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन सन्मान यात्रेनिमित्त आयोजित भव्य सभेस संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी राज्यात नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना नवीन घोषणा केली. यावेळी मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होता.
माजलगाव येथील मंगलनाथ मैदानात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रेची सभा घेण्यात आली. आ. प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.चे माजी सभापती जयसिंग सोळंके यांनी या भव्य सभेचे नियोजन केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यात युती सरकारमध्ये समाविष्ट होवून राज्यातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजनां सुरु केल्याचे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना लाडक्या बहिंणीच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे आत्ताच पाठवलेत. येणाऱ्या दिवाळीला देखील आक्टोंबर व नव्हेबंर या दोन महिन्याची रक्कम आचारसंहिता लागण्यापुर्वी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून टाकणार असल्याची घोषणा यावेळी केली. या जन सन्मान यात्रेत कृषीमंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. विक्रम काळे, कल्याण आखाडे, धैर्यशिल सोळंके, मंगलाताई सोळंके यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक जयसिंग सोळंके यांनी तर आभार अच्युतराव लाटे यांनी मानले. यावेळी माजलगाव मतदारसंघातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.