राजकीय

Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत.

64 / 100

मुंबई दि.18 एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत Ajit Pawar असल्याचा खळबळजनक दावा द न्यू इंडियन एक्सप्रेस या दैनिकाने केला आहे. दरम्यान काल तीन आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिल्याने राष्ट्रवादीत ( NCP ) चाललय काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( Ajit Pawar 40 out of 53 NCP MLAs with Ajit Pawar. )

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत ( BJP ) जाणार असल्याच्या बातम्या ठळकपणे चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ( Supreme Court ) सत्ता संघर्षावरील निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भुकंप होणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. यातच खुद्द अजित पवार यांनीच सुप्रिम न्यायालयाच्या ( Supreme Court ) निकालानंतरही आकडे कसे सत्ताधिकाऱ्यांच्या बाजुने आहेत हे माध्यमासमोर मांडले होते. मात्र तरीही अजित पवारांच्या भाजपसोबत ( BJP ) जाणार असल्याच्या बातम्या काही थांबत नाहीत. अंजली दमानिया व प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंतर राजकीय चर्चेंना उधान आले आहे.

53 पैकी 40 आमदार अजित पवारांसोबत.
काल दि.17 सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) तीन आमदारांनी आपण अजितदादांसोबत असल्याचे जाहीर केले. यात आमदार आण्णा बन्सोडे, आमदार माणिकराव कोकाटे यांनी माध्यमासमोर दादासोबत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्वीट करुन स्पष्टीकरण दिले आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या असत्य आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज इफ्तार पार्टी आयोजित केली असून यात सहभागी होण्यासाठी पक्षाचे आमदार व खासदार मुंबईकडे रवाना झाले असल्याचे कळते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!