बीड जिल्ह्याला आज दिलासा; धारुर व केजमध्ये संख्या वाढली… पहा तालुका निहाय आकडेवारी

बीड दि.22 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज उतरत असल्याचे दिसुन आले. कालची साडेतीनशेची विक्रमी संख्या आज 239 वर आली. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2179 प्राप्त अहवाला पैकी 239 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1940 जण निगेटिव्ह आली आहेत. आज सतराव्या दिवशी बीड तालुक्यात 106 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. केज 20 तर धारुरमध्ये आज 12 कोरोना बाधित आढळली आहेत.
(Relief to Beed district today; The number has increased in Dharur and Kaij … see taluka wise statistics)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड- 106, अंबाजोगाई-43, आष्टी-15, धारुर-12, गेवराई-10, केज-20, माजलगाव-11, परळी-15, पाटोदा-2, शिरुर-3, वडवणी-2
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.22 सोमवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 336 वरुन 239 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आज दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, रविवारी राज्यात दिवसभरात 30 पेक्षा जास्त हजार नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळळली आहे. महाराष्ट्र राज्य आशिया खंडात सर्वाधिक रुग्णांचा हॉटस्पॉट बनला आहे. पुण्यात मुंबई पेक्षा जास्त रुग्ण आढळून आली आहेत.