बीड जिल्ह्याला आज दिलासा; धारुर 48 तर केज 136, पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.16 मे – बीड (Beed) जिल्ह्यातील 4056 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 897 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3159 जण निगेटिव्ह आली आहेत. आज अनेक दिवसांनंतर जिल्ह्याची आकडेवारी हजाराच्या आत आल्याने दिलासा मिळत आहे.
(Relief to Beed district today; Dharur 48 and Cage 136, see taluka wise statistics.)
आज बीड तालुक्यात 116 कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. जिल्ह्यात आज अंबाजोगाई तालुक्यात 97, आष्टी तालुक्यात 119 रुग्ण आढळली. धारुर तालुक्यात 48 तर केजमध्ये 136 पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आहे.
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-116, अंबाजोगाई-97, आष्टी-119, धारुर-48, गेवराई-77, केज-136, माजलगाव-71, परळी-57, पाटोदा-102, शिरुर-40, वडवणी-34 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या दररोज हजार ते बाराशेवर स्थिरावलेली दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा काल मध्यरात्री पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा अंमल सुरु झाला आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली असून, दिवसभरात 34,848 नवे रुग्ण आढळले तर 960 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद शनिवारी झाली. रुग्णसंख्या कमी होत असतानाच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. राज्यात सध्या 4 लाख 94 हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात 59 हजार रुग्ण करोनामुक्त झाले. गत महिन्याच्या तुलनेत परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.