आजची मंत्रिमंडळ बैठक या कारणाने रद्द!

मुंबईः दि.२३- आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृती अस्वस्थाचे कारण देण्यात आले आहे. अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा अत्यंत महत्वाच्या विषयावर मदतीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार होती.

गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार ते मुख्यमंत्री व अख्खे मंत्रिमंडळातील सदस्य विरोधी पक्षाचे नेते थेट बांधावर पोहोचले होते. आज होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र आजची बैठक लांबल्यामुळे शेतकऱ्यांना आठवडाभर मदतीच्या घोषणेची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!