बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी…

बारामतीः दि.३१- आज दि.३१ रविवार रोजी बारामतीत (Baramati) मुख्यमंत्री (Chief Minister) रोजगार निर्मितीअंतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार फटकेबाजी केली. बारामतीतील विरोधकांचा ही जित्राबं लय वाईट अशा शब्दात समाचार घेत चुकीचे काम केले तर जेलमध्ये चक्की पिसायला पाठवेन या शब्दात पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
आज बारामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच फटकेबाजी केली ते म्हणाले, मुख्यमंत्री (Chief Minister) रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थ, दलालाची गरज नाही. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, त्यात कुचराई करू नये. पात्रता व गरज असणाऱ्यानांच लाभ द्या बोगस लाभार्थी नकोत, कोणी यात पैसे खायचा प्रयत्न कला तर जेलमध्ये जावे लागेल. मग तेथे चक्की पिसावी लागेल, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. बारामतीकरांनी ज्या विश्वासाने आमच्यावर प्रेम केले, त्यातून उतराई होण्यासाठी सकाळपासूनच कामाला सुरुवात केली जात आहे. विविध कामे मार्गी लावली जात आहेत. सूर्य उगवल्यावर जरा दिसायला लागल्यावर मी कामाला सुरुवात करतो, नाही तर रात्री पण काम केले असते, अशी टीपण्णी पवार यांनी केल्यावर हशा पिकला. बारामती शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. त्यासाठी साठवण तलाव उभारले जात आहेत. कालव्याचे सुशोभीकरण करताना काहींनी आता विहिरी, बोअरवेलचे पाणी कमी होईल असे म्हणत आंदोलने सुरु केली आहेत. वास्तविक या कामाचा आणि पाणी कमी होण्याचा काही संबंध नाही. काही लोक चांगल्या कामात बिब्बा कालवतात. ही जित्राब लय वाईट, अशा शब्दात पवार यांनी बारामतीतील (Baramati) विरोधी पक्षांचा समाचार घेतला. त्यांच्याकडे लक्ष देवू नका. तसेही निवडणूकीत कोणी बाहेरचं पार्सल आलं तरी तुम्ही डिपॉझिट जप्त करून परत पाठवताच, अशी टीपण्णीही पवार यांनी केली. मी आता साठीच्या पुढे गेलो आहे, परंतु जसजसे वय वाढतेय तसा उत्साह वाढतोय. मी कामाच्या उत्साहासंबंधी बोलतोय, नाही तर तुम्हाला वेगळेच काही वाटायचे, अशी मिश्किल टिपण्णी पवार यांनी केली. बारामतीत कोणी चुकीच्या गोष्टी करत असेल तर त्यांच्यावर अॅक्शन घेण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले.