कोरोंना विशेष

धक्कादायक…. ब्रिटनच्या नव्या कोरोनाची भारतात इंट्री… महाराष्ट्रात ही आढळले रुग्ण

मुंबईः दि.२९ – २०१९ मध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना (Corona) ब्रिटनमध्ये वर्षाला निरोप देत असताना नवीन स्वरुपात समोर आला असून या नव्या कोरोना स्ट्रेनने भारतातही प्रवेश केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतात (India) कोरोनाच्या नव्या प्रकाराचे एकुण ६ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये (UK) आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची (Strain) लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण ६ जणांच्या नमुन्या पैकी ३ बेंगळुरूतील NIMHANS मध्ये, २ हैदराबादमधील CCMB मध्ये तर पुण्यातील १ जण NIV मध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

विमानसेवा बंद केल्यानंतर काही पुर्वनियोजित विमान ब्रिटनहून (UK) भारतात (India) आली होती. या विमानातील प्रवाशांच्या कोरोना (Corona) तपासणी साठी नमुने घेण्यात आली होती. पॉझिटीव्ह (Positive) आलेल्या रुग्णांची नव्या कोरोना स्ट्रेनची (Strain) तपासणीचे नमुने घेण्यात आले होते. यात ६ जण नव्या स्ट्रेनने बाधित असल्याचे आढळले. यामुळे खळबळ माजली असून अवघ्या दोन दिवसावर होणारे नववर्षाच्या स्वागतासाठी तयार असलेल्या जनसामान्यासह प्रशासनाची डोकेदुखी यामुळे वाढणार आहे. महाराष्ट्रात इंग्लंड आणि ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी नागपूर, औरंगाबाद आणि कल्याणमधील प्रत्येकी एक जण कोरोना पॉझिटिव्ह (Positive) सापडला आहे. या तिघांचे नमुने पुण्यातील NIV लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या तिघांवरही उपचार सुरू आहेत. पुण्याच्या लॅबमधून येणाऱ्या अहवालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!