हवामान

Monsoon शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; हवामान विभागाची मान्सून बाबत मोठी घोषणा.

59 / 100

मुंबई दि.19 जून – Monsoon बिपरजॉय चक्रीवादळामुळे रखडलेले मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लवकरच होणार आहे. येत्या 72 तासात मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाकडून Meteorological department माहिती देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होणार आहेत. Monsoon… Good News for Farmers; Meteorological department’s big announcement regarding monsoon.

मे महिना उलटल्या नंतर शेतकऱ्यांसह सामान्य लोक जून महिन्यात पडणाऱ्या मान्सूनच्या Monsoon पावसाची प्रतीक्षा करतात. सर्वसाधारण मान्सून 1 जूनला केरळात दाखल होतो. परंतु यंदा मान्सून केरळात 8 जूनला दाखल झाला होता. त्यांनतर तीनच दिवसात म्हणजेच 11 जून रोजी राज्यातील कोकणात दाखल झाल्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार असा अंदाज होता. परंतु बिपरजॉय चक्रीवादळामुळे Cyclone Biperjoy राज्यातील मान्सून खोळंबला. मान्सून अजूनही सक्रीय झालेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता कोकणातून मान्सूनची वाटचाल सुरु होणार आहे. मुंबईत मान्सून Monsoon येत्या 72 तासांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून Meteorological department देण्यात आली. अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्याच्या द्दष्टीने हालचाली सुरु झाल्या असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.

यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा थांबलेला प्रवास सुरु होणार आहे. येत्या 72 तासांत तो मुंबईत दाखल होवून राज्यात प्रवेश करणार आहे. दक्षिणेत पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारत, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या मैदानी भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बिपरजॉय चक्रीवादळामुळे Cyclone Biperjoy काही भागात पाऊस पडला आहे. परंतू मान्सून आला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत होता. 72 तासात राज्यात मान्सून दाखल होण्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!