समर्थकांची अलोट गर्दी; संजय राठोड यांची प्रतिक्रिया व शितल राठोड यांना का आली भोवळ…पहा

पोहरादेवीः दि.२३- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड सपत्नीक आज पोहरादेवी गडावर गेले. यावेळी पूजा चव्हाणचा मृत्यू हा दुर्दैवी होता. तिच्या आत्महत्येवरुन घानेरडे राजकारण केले जात असल्याची प्रतिक्रिया राठोड यांनी दिली. याप्रसंगी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे मात्र संजय राठोड यांच्या पत्नी शितल राठोड यांना भोवळ आल्याची घटना घडली.

(Alot of crowd of supporters; Sanjay Rathore’s reaction and why Sheetal Rathore got dizzy … see)

वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आज पोहरादेवीच्या दर्शनासाठी गडावर येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. पोलिसांनी ५० जणांनाच गडावर उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. पण सर्व नियम धाब्यावर बसवून समर्थकांनी गडावर गर्दी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. याच गर्दीचा त्रास राठोड यांच्या पत्नीला झाला. मात्र समर्थकांनी केलेल्या अलोट गर्दीमुळे राठोड व त्यांच्या पत्नी शीतल यांना गर्दीतून वाट काढणेही कठीण झाले. यावेळी तोंडावर मास्क व गर्दीमुळे शीतल यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना भोवळ आली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan suicide case) वनमंत्री संजय राठोड हे आज तब्बल १५ दिवसांनी जनतेच्या समोर आले. संजय राठोड आज सकाळी १०: १५ वाजताच्या सुमारास दुपारी १२: ४० वाजता संजय राठोड वाशिम येथील पोहरादेवी येथे पोहचले. गेल्या १५ दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन (Pooja Chavan suicide case) अनेक चर्चा रंगल्या. संजय राठोड यांच्या पत्नी शीतल चव्हाण या सर्व प्रकरणात त्यांच्यासोबत होत्या.

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पत्रकार परिषद घेतली, पूजा चव्हाणचा मृत्यू हा दुर्दैवी होता. तिच्या आत्महत्येवरुन जे घानेरडे राजकारण केले जात आहे ते अतिशय चुकीचे आणि निराधार आहे. गेली ३० वर्षे मी मागासवर्गीय,विमुक्त भटक्या कुटुंबातून ओबीसीचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य उद्धवस्त करण्याचा वाईट प्रकार आपण सगळ्यांनी पाहिला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत असल्याने माध्यमाचे लक्ष लागून होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!