हाडाचा शिक्षक गेला… बाबासाहेब नखाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

किल्लेधारूर दि.9 डिसेंबर – धारुर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात शांत व संयमी हाडाचा शिक्षक म्हणून ओळख असलेले सेवानिवृत्त केंद्र प्रमुख बाबासाहेब नखाते यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) रात्री निधन झाले.
(Bone teacher dies … Babasaheb Nakhate dies of heart attack.)
धारुर (Dharur) तालुक्यातील मुळ हसनाबाद येथील रहिवासी सेवानिवृत्त केंद्र प्रमुख बाबासाहेब आप्पाराव नखाते (59) यांना दि.8 रोजी सांयकाळी हृदयविकारा धक्का आला. त्यांना उपचारासाठी धारुर व अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांनी धारुर शहरातील केंद्रीय प्राथमिक शाळेत अनेक वर्ष सेवा केली. तालुक्यातील अंजनडोह येथे केंद्र प्रमुख (Center Head) म्हणून त्यांनी काम केले. मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान यामुळे ते विद्यार्थीप्रिय होते. गतवर्षीच जवळजवळ 32 वर्षांची शैक्षणिक सेवा (Educational Services) दिल्यानंतर ते सेवानिवृत्त (Retired) झाले होते.
त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी हसनाबाद तालुका धारूर, जिल्हा बीड येथे आज दिनांक 9 डिसेंबर 2021 गुरुवार रोजी सकाळी 10:30 मिनिटांनी होणार आहे. त्यांच्या निधनामुळे हाडाचा शिक्षक गेल्याची प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक शिक्षक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.