बीड जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारीत आदेश; पहा काय सुरु काय बंद.

बीड दि.8 मे – बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा (Corona Infection) वेग वाढत असून दररोज बाराशे पेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित रुग्ण (Corona Positive) आढळून येत आहेत. बीड जिल्हा प्रशासनाने काल काढलेला नवीन आदेशात अंशतः बदल करत सुधारित आदेशात निर्बंधात (Restrictions) सुधारणा केली आह . तसा आदेश जिल्हाधिकारी (Collector) रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी आज शनिवारी दि.8 मे रोजी काढला आहे.
(Amended order of Beed Collector; See what started, what stopped.)
कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) दुसऱ्या लाटेत बीड जिल्ह्यात प्रकोप वाढला आहे. यापुर्वी राज्य शासनाने कडक निर्बंध (Restrictions) जाहीर करुनही लोकांचा संचार कमी होत नाही. यामुळे कोरोना साखळी तोडण्यात अपयश येत आहे. काल नवीन आदेश काढल्यानंतर ईदच्या पार्श्वभूमीवर आज काही शिष्टमंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून आदेशात शिथिलता देण्याची मागणी केली होती.
याची दखल घेत आज पुन्हा बीड जिल्हावासियांना नवीन सुधारित आदेश काढत काही आस्थापनांना शिथिलता दिली आहे. नवीन आदेशानूसार दि.9 रविवार पासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खालील बदल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी (Collector) रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी दिले आहेत. या बदलात मंगळवार व बुधवार (दि.11 व 12 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना सकाळी 7 ते 10 सुरु ठेवता येणार आहेत.
नवीन नियम…
1. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार (दि.8, 9, 10, 11 व 12 मे) या दिवशी केवळ औषधालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, फार्माट्युकल्स, फार्माट्युकल कंपन्या, इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना व डिलर, वाहतुक आणि पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॕनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल व सहाय्य सेवा, पेट्रोल पंप, टपाल सेवा हेच चालू राहणार.
2.दुध, भाजी व फळ विक्री दररोज सकाळी 7 ते 10 यावेळेत सुरु राहिल.
3. गॕस वितरण दिवसभर सुरु राहिल.
4. बँकेचे कामकाज दररोज सकाळी 10 ते 12 या वेळेत अंतर्गत कामकाजासाठी व व्यवहारासाठी सुरु राहिल.
5. शनिवार, रविवार, सोमवार (दि.9 व 10 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना संपुर्णतः बंद राहतील.
6. मंगळवार व बुधवार (दि.11 व 12 मे) जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत (Essential services) मोडणाऱ्या आस्थापना ज्यात किराणा दुकान, भाजीपाला, मटन, चिकन विक्री दुकाने, बेकरी व कृषीशी निगडित अस्थापना सकाळी 7 ते 10 सुरु राहतील.
7. सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे कार्यालय प्रमुखाचे ओळखपत्र असेल त्यांना ये जा करण्याची मुभा असेल.