हळदी कुंकू व तिळगुळाच्या कार्यक्रमातून अमोल आंधळेंचा वडवणीच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक…..
महिलांचा प्रचंड प्रतिसादानंतर तालुक्यात चर्चा

वडवणीः दि.२७(प्रतिनिधी)- वडवणी शहरात मकर संक्राती (Makar Sankranti) निमित्त आंधळे परिवाराचा हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ पार पडला. महिलांच्या विविध खेळाने लक्ष वेधुन घेतले तर हजारो महिलांनी बक्षीसांची लयलुट केली. वडवणी शहराच्या इतिहासात अमोल आंधळे यांनी घेतलेल्या पहिल्याच अभुतपुर्व कार्यक्रमामुळे वडवणीच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक (Master stroke) बसल्याची चर्चा तालुकाभरात होत आहे.
दिनांक २४ जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील माजी आमदार केशवराव आंधळे यांच्या निवासस्थानासमोर दुपारी १ वाजता लक्ष्मीमाता संस्थानच्या ह.भ.प. लक्ष्मीताई यांच्या हस्ते शुभारंभ करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शंकर आंधळे, संजय आंधळे, शिवाजी आंधळे, अमोल आंधळे, उद्धव बडे, मयुर आंधळे, सुशिल बडे, अशोक आंधळे, विलास राठोड हे उपस्थित होते. संगीत खुर्ची, लिंबु चमचा, फुगे फुगवीने, फुगडी, उखाणे स्पर्धा, चित्र ओळखणे, अचुक टिकली चिटकवणे, बकेट बॉल स्पर्धा, मनोरा, मेणबत्ती पेटवणे, अंताक्षरी इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. ‘कणभर तिळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा असे म्हणत आंधळे परिवारातील महिलांनी आलेल्या महीलांचा आदर सत्कार केला. अचुक व योग्य नियोजनामुळे हळद कुंकू व तिळगुळ समारंभाची शोभा वाढवली. वडवणी (Wadvani) शहरातील राम मंदीर परिसर, सुदर्शन नगर, काळा हनुमान मंदीर परिसर, चिंचवण रोड परिसर, भिमनगर, वानवळगल्ली, मुस्लीम मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, पावरलुम परिसर, बिचकुलदरा तांडा, सरकारखोरी तांडा, चौफाळदरा तांडा, हंडगदरा तांडा, धैसतांडा, विठ्ठल रुक्मिणी, शेरी, बोरफडी, दत्तनगर, ठाकरवडा, जोड अंबा तांडा, सौंदडवस्ती, लोखंडीवस्ती, पांढरवस्ती, कदमवस्ती, मसणजोगी वस्ती, शिकलकरी वस्ती, वंजारा वस्ती, कैकाडी वस्ती, वडारवाडा, पंचशील नगर, रमाईनगर, गोपालनगर, शिक्षक कॉलनी, सिंधफणा शाळा परिसर इत्यादी ठिकाणाहुन महिलांची प्रचंड उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुलोचना आंधळे, किष्किंदा आंधळे, छाया आंधळे, नम्रता आंधळे, अमृता आंधळे, जिजाबाई धस, कुसुम डोईफोडे, शोभाताई डोईफोडे, बाळुताई नागरगोजे, सोनाली बडे, अश्विनी बडे, वैशाली बडे, डॉ.वर्षा बडे, संजिवनी मुंडे, शारदा आंधळे, शितल लाटणे, प्रिती कुरकुटे व आंधळे (Andhale) परिवार, नातेवाईक व मित्र परिवारांनी अथक परिश्रम घेतले.
मकरसंक्रांतीचे वान, सुवासिनीला मान
मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti) वान आणि सुवासिनीला मान देत हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ दरम्यान आयोजीत केलेल्या महिलांच्या विविध प्रोत्साहनपर खेळांमध्ये कपबशी, कचराकुंडी, विविध फुलांची झाडे, टिफीन डब्बा, स्टील प्लेट, तिळगुळ यासह विविध वानाची महिलांनी लयलुट केली.
मनात वेगळे असल्याचे दिसले
वडवणी नगरपंचायतचे आरक्षण, वार्ड रचना, मतदार याद्या प्रसिद्धी या प्रक्रीया पार पडत असतांना आंधळे परिवाराने ‘न भुतो ना भविष्यती’ असा हळदी कुंकू व तिळगुळाचा भव्य समारंभ घेऊन वेगळ्याच चर्चेला उधाण आणले. वार्डा-वार्डातील प्रत्येक समाजातील महिलांना निमंत्रीत करुन येणाऱ्या काळात नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी वेगळे करण्याचे संकेत दिले असल्याचे दिसले.
अमोल आंधळेंचा वडवणीच्या राजकारणात मास्टरस्ट्रोक.
तळागळातील कार्यकर्त्याला सोबत घेत विविध समाजातील महत्वाच्या व्यक्तींना मान सन्मान देऊन आपलसं करुन नगरपंचायत निवडणुकीच्या आधी वातावरणात जान आणण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच वडवणीच्या राजकारणात बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. हळदी कुंकू व तिळगुळ समारंभाच्या निमित्ताने आंधळे परिवाराचे उमलतं युवा नेतृत्व अमोल आंधळें (Andhale) यांचा वडवणीच्या (Wadvani) राजकारणात मास्टरस्ट्रोक (Master stroke) ठरला आहे.