कोरोंना विशेष

धारुरच्या कमी झालेल्या संख्येत वाढ; पहा किती व कोणत्या भागातील आहेत पॉझिटीव्ह रुग्ण

किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या ६ ॲन्टीजन (antigen) तपासणीत २ पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. तर काल पाठवण्यात आलेल्या २० स्वॅब (Swab) पैकी ५ पॉझिटीव्ह (positive) अशी एकुण ७ रुग्ण आढळली आहेत. एकाचा अहवाल अनिर्णित आला आहे.

आज केवळ ६ ॲन्टीजन चाचण्या करण्यात आल्या. या तपासणीत २ पॉझिटीव्ह आढळली असून चौघे निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेल्या २० स्वॅब (Swab) नमुन्यापैकी ५ पॉझिटीव्ह (positive) अहवाल प्राप्त झाली आहेत. यापैकी एकाचा अहवाल अनिर्णित असून आज एकुण ७ कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात अत्यंत कमी संख्या होती. आज २१ जनांचे स्वॅब (Swab) नमुने तपासणी साठी अंबाजोगाईला पाठवण्यात आली असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.

ॲन्टीजन (antigen) तपासणीत आढळलेले रुग्ण

१. २१ वर्षीय पुरुष, कसबा विभाग, धारुर

२. ४० वर्षीय स्त्री, तेलगाव, ता.धारुर

स्वॅब (Swab) नमुन्यात आढळलेले

३. ४६ वर्षीय स्त्री, आसोला, ता.धारुर

४. ३१ वर्षीय स्त्री, जोडआड गल्ली, धारुर

५. ७० वर्षीय पुरुष, जोडआड गल्ली, धारुर

६. ७० वर्षीय पुरुष, मस्सा, ता.कळंब

७. ३० वर्षीय पुरुष, आशोक नगर, धारुर

यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!