इंडिकाच्या धडकेत धारुर तालुक्यातील वृध्द ठार; बीड-परळी रोडवरील घटना.

किल्लेधारूर दि.30 जुलै – धारुर तालुक्यातील जहागीर मोहा येथील उसतोड कामगार ज्ञानोबा बळीराम सिरसट (वय 65) वर्ष यांना वडवणी येथे बीड-परळी रस्त्यावर इंडिका गाडीने धडक दिली. या अपघातात (Accident) उपचार सुरु असताना त्यांचे बीड येथील रुग्णालयात निधन झाले.
(An old man from Dharur taluka was killed in an Indica collision; Incident on Beed-Parli Road.)
जहागीर मोहा ता. धारुर (Dharur) येथील ज्ञानोबा बळीराम सिरसट (वय 65) हे वडवणी तालूक्यातील म्हातारा म्हसोबा येथे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पोखरी फाटा येथे परत येण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना एम. एच. 12 सि. आर. 6611 या इंडीकागाडीने उडवल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीड (Beed) येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात सिरसट यांचे दोन्ही पाय मोडले होते. तर डोक्याला दुखापत झाली होती. बीड येथे रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. ते धारुर पोलिस (Police) ठाण्यात सफाई काम करणारे चंद्रकांत सिरसट यांचे वडीलभाऊ होत. त्यांच्या पार्थिवावर आज जागिर मोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.