आनंद वार्ता…. अहमदनगर बीड परळी रेल्वेमार्गावर प्रत्यक्षात धावणार रेल्वे.

बीड दि.8 डिसेंबर – अहमदनगर-बीड-परळी (Ahemadnagar Beed Parli) या रेल्वे मार्गातील कुंठेफळ येथील सुमारे 500 मीटर लांबीचा व 33.5 मीटर उंचीच्या मेहेकरी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता नगर ते आष्टी या 64 कि.मी.अंतराची रेल्वेची (Railway) चाचणी प्रत्यक्षात घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे..
(Anand Varta …. Ahmednagar Beed Parli railway line will actually run.)
1997 मध्ये मंजुरी मिळालेला नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जलद वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मधल्या काळात निधीच्या कमतरतेमुळे या मार्गाचे काम रखडले होते. मात्र केंद्राप्रमाणे राज्य सरकारही निधी उपलब्ध करून देत असल्याने गेल्या पाच वर्षात या कामाने वेग पकडला आहे.
मागील 2 वर्षात नगर ते नारायण डोहो व नारायण डोहो ते सोलापुरवाडी अशा दोन टप्प्यांची चाचणी यशस्वी झाली आहे . आता या मार्गात येणाऱ्या सर्वात मोठ्या कुंठेफळ येथील मेहेकरी ब्रीजचे (Mehekari Bridge) काम पूर्ण झाले आहे. आता सोलापुरवाडी ते आष्टी (Ashti) या 32 कि. मी. अंतराची चाचणी घेण्यात येणार आहे. अशी माहिती रेल्वेचे उपमुख्य अभियंता (निर्माण) विजयकुमार रॉय यांनी दिली.
गेली तीस वर्ष बीड जिल्ह्याच्या राजकारणात सतत चर्चिले गेलेला रेल्वेमार्गावर प्रत्यक्षात रेल्वे पाहण्याचा क्षण बीडकरांना मिळणार आहे. 262 कि.मी. अंतराच्या या मार्गावर 23 लहान मोठी स्थानकं असणार आहेत. हा रेल्वेमार्ग परळी वैजेनाथ, धारुर, वडवणी, बीड, शिरुर, पाटोदा व आष्टी तालुक्यातून जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील जनतेचा हा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.