रामदास तपसे,संतोष रोकडे यांचा राज्य युवा परिषदेकडून सन्मान

केज दि.१२(प्रतिनिधी) न्यूज वन महाराष्ट्र या स्मार्ट टि.व्ही., पोर्टल आणि यूट्युबवरील लोकप्रिय मराठी चॅनलचे मुख्य संपादक रामदास तपसे आणि चॅनलचे विशेष प्रतिनिधी संतोष विठ्ठलराव रोकडे यांना राज्य युवा परिषदेकडून कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
मागच्या मार्च अखेर पासून ते आजपर्यंत देशात कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे. अशा परिस्थितीत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील बातम्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. यात प्रामुख्याने सामाजिक संघटना आणि समाजसेवकांच्या कार्याच्या बातम्या वेळोवेळी प्रकाशित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे काम न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टिमने केलेले आहे. याच निस्वार्थ कार्याची दखल घेऊन राज्य युवा परिषदेकडून रामदास तपसे आणि चॅनलचे विशेष प्रतिनिधी संतोष विठ्ठलराव रोकडे यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रामदास तपसे आणि संतोष रोकडे यांचे गोविंद भारती , श्रीमंत खांडेकर, दिनकर जाधव यांनी कौतुक केले. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.