धारुर तालुक्यातील अंजनडोह गावाला कोरोनाचा विळखा; आढळले तब्बल येवढे कोरोना बाधित;

किल्लेधारूर दि.17 एप्रिल – धारुर तालुक्यात सध्या ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात वाढलेल्या कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ॲन्टीजन ड्राईव्ह सुरु केला आहे. आवरगाव पाठोपाठ आता गेल्या दोन दिवसात अंजनडोह या गावात 13 कोरोना बाधित आढळले होते. आज या गावात ॲन्टीजन ड्राईव्ह घेण्यात आला यात 52 जणांची तपासणी झाली असून यात 13 अशी एकुण तब्बल 26 कोरोना बाधित (Corona Positive) आढळली आहेत.

(Anjandoh village in Dharur taluka to Corona Vilkha; Infected so many corona found;)

तालुक्यातील अंजनडोह, खोडस, आवरगाव, कोळपिंपरी, आसरडोह, मोहखेड या गावात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग आढळून येत आहे. यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने यागांवासाठी गावातील ग्रामस्थांच्या कोविड-19 ची तपासणी करण्याचे नियोजन केले. यासाठी तालुका आरोग्य कार्यालयाकडून कृती आराखडा आखण्यात आला असून विशेष ॲन्टीजन टेस्ट (Antigen Test) ड्राईव्ह घेण्यात येत आहे.

यासाठी भोगलवाडी व मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक नेमण्यात आले आहेत. भोगलवाडी केंद्राअंतर्गत अंजनडोह, खोडस, आवरगाव व कोळपिंपरी तर मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक आसरडोह व मोहखेड या गावात ॲन्टीजन टेस्ट (Antigen Test) ड्राईव्ह राबवणार आहेत. आज दि.17 शनिवारी ते 20 एप्रिल मंगळवार पर्यंत दररोज एका गावात ही तपासणी मोहिम होत आहे.

आज पहिल्या दिवशी अंजनडोह येथे ॲन्टीजन मोहिम राबवण्यात आली. आरोग्य कर्मचारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय पवार यांनी ही तपासणी केली. यात एकुण 52 लोकांची ॲन्टीजन तपासणी होवून यात 13 बाधित आढळले. दि.15 रोजी 5 तर दि.16 रोजी 8 अशा 13 मिळून एकुण 26 जण कोरोना बाधित (Corona Positive) एकट्या अंजनडोह गावात दोन दिवसात आढळली आहेत.

ग्रामीण भागातील गांजपुर व आरणवाडी या गावातही दोन दिवसात लक्षणीय रुग्ण आढळली आहेत. शहरात पालेभाज्या व दुध विक्रीसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची शहरात दररोज वर्दळ असते. यामुळे शुक्रवारी तहसीलदार वंदना शिडोळकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस व मुख्याधिकारी नितिन बागुल यांनी स्वतः भेटून सर्व विक्रेत्यास ॲन्टीजन चाचणी बंधनकारक केली आहे. दरम्यान, आज शहरात सपोनि सुरेखा धस यांनी पथसंचलन करत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना तंबी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!