धारुरचा आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात; सोनिमोह्यातून 2, तर एकुण 14 चोरीच्या दुचाकी जप्त.

किल्लेधारूर दि.11 जुलै – काल धारुर (Dharur) तालुक्यातील तेलगाव येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दिंद्रुड ता.माजलगाव पोलिसांच्या तपासात दुचाकी चोरीचे रॅकेट (Racket) उघडकीस आले असून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर आज यात आणखी दोन आरोपीची भर पडून चौघे पोलिसांच्या ताब्यात आली आहेत. यात धारुर व बीड तालुक्यातील आरोपींचा समावेश आहे. या चोरी प्रकरणात पोलिसांनी तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. यात धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे 2 दुचाकी आढळल्या.
(Another accused of Dharur in police custody; 2, while a total of 14 stolen bikes were seized from Sonimoha.)
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस (Police) हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनांत गेल्या काही दिवसापासून वाढ झाली होती. मोटार सायकल चोर सापडण्याचे मोठे आवाहन पोलिसांच्या पुढे निर्माण झाले होते. यातच दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव ता.धारुर येथे एक मोटारसायकल शुक्रवारी चोरीला गेली होती. दिंद्रुड पोलिसांनी याची गंभीर दखल घेत काही तासातच मोटारसायकल व चोरटा जेरबंद केला. दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रभा पुंडगे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
दुचाकी चोरांनी दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत हैदोस मांडला होता. दिंद्रुड सह माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी या चोरट्यांनी मोटरसायकलवर डल्ला मारला. तेलगाव ता. धारुर येथे शुक्रवारी मोटारसायकल चोरी (Motorcycle theft) होत असताना गोपनीय माहितीच्या आधारे दिंद्रुड पोलिसांनी गणेश काशिनाथ गायकवाड रा.पाथरी जि परभणी यास अटक केली.
दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणुन, त्याला विश्वासात घेऊन, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने या दुचाकी चोरीत (Motorcycle theft) आणखी काही साथीदार असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) आर. राजास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि (API) प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार व सांगितलेल्या ठिकाणी जाऊन एक दोन नव्हे तर तब्बल दहा दुचाकी जप्त करून आणुन त्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात लावल्या आहेत.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाची नियुक्ती करून रात्रीतून वडवणी येथुन एक, पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतुन तीन, सोनीमोहा ता.धारुर येथुन दोन, अंबाजोगाई पो.स्टे. हद्दीतुन एक, रायमोहा येथुन दोन व अन्य एक अशा तब्बल दहा दुचाकी जप्त केल्या. दहा मोटरसायकल जप्त तर अन्य जवळपास आठ मोटरसायकलचा सुगावा या आरोपींनी दिंद्रुड पोलिसांना दिला. या प्रकरणात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट (Racket) असण्याची शक्यता असल्याची शक्यता दिंद्रुड पोलिसांनी वर्तवली आहे.
दिंद्रुडच्या सपोनि (API) प्रभा पुंडगे यांच्यासह त्यांचे सहकारी पीएसआय (PSI) विठ्ठल शिंदे व अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, सरवदे, संजय मुंडे आदि पोलीसांनी रात्रभर जागरण करून दहा दुचाकींसह आरोपी नितीन वसंत मुंडे रा.पहाडी दहिफळ ता.धारूर, योगेश सोपान निरडे राहणार कचारवाडी ता धारूर, ज्ञानेश्वर सुग्रीव नागरगोजे रा. वडगाव (बुंदा) ता.जि.बीड अशा चार आरोपींना अटक केली. दिंद्रुड पोलीस आरोपींचा कसून तपास करत मोटार सायकल चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचे दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सपोनि प्रभा पुंडगे यांनी सांगितले.