आडसकरांच्या ताब्यातील मार्केट कमिटीला दुसरा धक्का; 22 भुखंडाचे वाटप रद्द… राष्ट्रवादीचा आनंदोत्सव.

किल्लेधारूर दि.14 सप्टेंबर – भाजपा नेते रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांचे वर्चस्व असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीतील 22 भुखंड वाटपाबाबत सात संचालकांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन पणन संचालक सतिश सोनी यांनी निकाल देत भुखंड वाटप रद्द केल्याचे आदेश दिले आहेत. गेल्याच आठवड्यात बाजार समिती आवारातील 50 लक्ष रुपयांच्या निविदा प्रक्रियेस सहायक निबंधकांनी स्थगिती दिली होती. यामुळे बाजार समितीला हा दुसरा धक्का बसला आहे.

(Another blow to the market committee in Adaskar’s possession; Allocation of 22 plots canceled … NCP’s celebration.)

येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे (BJP) निर्विवाद वर्चस्व आहे. तर राष्ट्रवादीचे (NCP) सात सदस्य आहेत. विधानसभेच्या निवडणूकीतील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे  आ.प्रकाशदादा  सोळंके व भाजप नेते रमेश आडसकर यांच्यामुळे बाजार समिती चर्चेत आहे.  बाजार समितीने दि.14/01/2020 मधील ठराव क्र 5 व दि.16/06/2020 मधील ठराव क्र 10 प्रमाणे आवारातील 22 रिक्त भुखंडाचे वाटप केले होते. परंतू यास चंद्रकांत हरिकिशन लगड, गणेश बिभिषण सोळंके, सादेक बाबामिया इनामदार यांच्यासह सात संचालकांनी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरुन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांनी चौकशी केली. चौकशीचा अंतिम अहवाल पणन संचालनालयाकडे सादर करण्यात आला. या अहवालावरुन दि.2 सप्टेंबर रोजी पणन संचालक सतिश सोनी यांनी सदरील 22 भुखंड वाटप रद्द करण्याचे आदेश काढत कार्यवाहीचे निर्देश दिले.

सहायक निबंधकांचा दणका
कृषी उत्पन्न बाजार समितीने (market committee) रस्त्याचे काम करण्यासाठी पन्नास लक्ष रुपयांची टेंडर काढण्यात आले होते . बाजार समिती संचालक चिंतामण सोळंके व अमोल जगताप यांनी तक्रार केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक धारूर यांनी 50 लाख रुपयांची टेंडर प्रक्रियेस (tender notice) स्थगित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून फटाक्याची आतषबाजी
22 भुखंड रद्दचे आदेश प्राप्त झाल्याने आज दि.14 मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी नावारुपाला आणलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ताधारी सभापती व संचालक समितीत भ्रष्टाचार करुन विकण्याचे कार्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा संचालक आमोल जगताप यांनी यावेळी केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, युवानेते सुधीर शिनगारे, बालासाहेब मायकर, नगरसेवक संजित कोमटवार, सटवा अंडील, प्रदीप नेहरकर, गौतम चव्हाण, परमेश्वर राऊत, सय्यद रज्जाक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!