आणखी एक कांस्यपदक… महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे.

नवी दिल्ली दि.4 अॉगस्ट – महिला बॉक्सिंग (women’s boxing) सेमिफायनलमध्ये लवलिनांचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं.

(Another bronze medal … Indian boxer Lovelina has made history in women’s boxing.)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लवलीना बोर्गोहाइन (Lovelina Borgohine) हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात अपयश आलं. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेन ला 4-1 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं जर्मनीच्या अनुभवी नादिन अपेट्स (Nadine Apetz) ला पराभूत केलं होतं. 69 किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी होती. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी लवलीना तिसरी बॉक्सर बनली आहे.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलीनानं मोठ्या संघर्षातून हे यश मिळवलं आहे. लवलीना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलीनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलीनानं ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!